लोटे परशुराम उद्योजक संघटनेचा कोकण गौरव पुरस्कार जाहीर, व्यक्तीगत विभागात उद्योजक उदय लोध तर संस्था विभागात जिद्द मतीमंद मुलांच्या शाळेला पुरस्कार


लोटे परशुराम उद्योजक संघटनेच्या वतीने प्रतिवर्षी कोकण गौरव पुरस्कार दिले जातात. यावर्षी संस्था विभागात चिपळूणच्या कोकण वुमेन, युथ अँड स्टुडंट्स डेव्हलपमेंट सेंट्रल सोसायटीची जिद्द मतिमंद मुलांची शाळा या संस्थेला पुरस्कार जाहीर करण्यात आला. तसेच व्यक्तीगत विभागात संगमेश्वरच्या श्री. उदय श्रीधर लोध यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला.
लोटे परशुराम उद्योजक संघटनेच्यावतीने कोकणात उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्ती आणि संस्थेला कोकण गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. राज आंब्रे व जनरल सेक्रेटरी श्री. राजकुमार जैन यांनी पुरस्कारांची घोषणा केली. जिद्द मतिमंद मुलांची शाळा ही चिपळूणमधील एक संस्था आहे, जी दिव्यांग मुलांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या विष्यासाठी काम करते, जिथे त्यांना प्रेमळ आणि विशेष वातावरणात वाढवले जाते. ही एक विशेष शाळा आहे, जी मतिमंद बौद्धिक अक्षम असलेल्या मुलांसाठी तसेच दिव्यांग मुलाच्या सर्वांगीण, शिक्षण आणि कौशल्य विकासाचे कार्य करत आहे. ही शाळा त्यांच्या विकासासाठी प्रयत्नशील असून, त्यांचे जीवन अधिक सुकर आणि स्वावलंबी बनवण्यासाठी प्रशिक्षण देते. मतिमंद मुलांना शिक्षण देणे, त्यांची कौशल्ये विकसित करणे आणि त्यांना समाजात एकटे न राहाता स्वावलंबी बनवणे हा मुख्य उद्देश या शाळेचा आहे.
फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष उदय
लोध हे उद्योजक, स्वयंरोजगार आणि वाहतूक क्षेत्रातील त्यांच्या कार्यासाठी ओळखले जातात, विशेषतः महाराष्ट्रात स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देणे, उद्योजकांशी संवाद साधणे आणि करांच्या मुद्यांवर मत मांडणे यांसारख्या कामांसाठी ते चर्चेत असतात, विविध स्वयंरोजगार शिबिरात मार्गदर्शन आणि पेट्रोल डिझेलवरील करांच्या सदर्भात त्यांची भूमिका महत्वाची असते. त्यांनी पर्यटन व आदरातिथ्य आणि पेट्रॉल व डिझेल सेवा तळागाळापर्यत पोहोचवली आहे. लायन्स इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणार्‍या संघटनेचे डिस्ट्रीक्ट गर्व्हनर पद त्यांनी यशस्वीरीत्या सांभाळले आहे. भारतीय पेट्रोलियम डिलर्स संघाचे ते संस्थापक सदस्य असून सध्या ते भारतीय पेट्रोलियम डिलर्स संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम करत आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button