
६३ व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनात सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट सावर्डेच्या विद्यार्थ्यांना राज्य पुरस्कार
कला संचालनालय, मुंबईच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ६३ व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनात सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट, सावर्डेच्या विद्यार्थ्यांनी दैदीप्यमान यश संपादन केले आहे. यामध्ये प्रथमेश गोंधळी याने राज्यात दुसरा क्रमांक, विशाल गोवळकर याने राज्यात चौथा क्रमांक पटकावला असून, गौरव वाकचौरे याला गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. या यशाने महाविद्यालयाच्या शीरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. कला संचालनालय मुंबईच्यावतीने महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. या प्रदर्शनासाठी व्यावसायिक व विद्यार्थी असे दोन विभाग असतात. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांच्या कलाकृतीची निवड होणे ही कलाक्षेत्रातील अत्यंत गौरवाची बाब मानली जाते.www.konkantoday.com




