देवरुखात आपचे उमेदवार सुजित सुर्वे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन


संगमेश्वर तालुक्यातील धामणी गणातून आम आदमी पक्षाकडून निवडणूक लढविणारे कुंभारखाणी बुद्रुक येथील सुजित गणपत सुर्वे (वय ५७) यांचे आज सकाळी तहसीलदार कार्यालयाबाहेर हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
आज तहसीलदार कार्यालयात उमेदवारी अर्जांची छाननी सुरू होती. यासाठी सुजित सुर्वे कार्यालयात प्रवेश करत असतानाच पोर्चबाहेर त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले व ते खाली कोसळले. उपस्थितांनी तात्काळ त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तपासणी सुरू असतानाच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी त्यांचे मावस भाऊ अनिल सुर्वे, उबाठा शिवसेनेचे नेते संतोष थेराडे, मुन्ना थरवळ, इशत्याक कापडी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष काशिनाथ वाजे, आशिष सुर्वे व अन्य सहकाऱ्यांनी मदत केली.
सुजित सुर्वे यांच्या निधनाने तालुक्यात सर्वत्र शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले व इतर नातेवाईक असून सर्व कुटुंबीय मुंबईत राहत असल्याने त्यांचे पार्थिव मुंबई येथे नेण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button