
ठाकरे बंधू की BJP; मुंबईत कोणाची सत्ता येणार?
सर्वात श्रीमंत महापालिका असणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतदान झालं असून, आता सर्वांच्या नजरा निकालाकडे आहे. मुंबईवर मागील 25 वर्षांपासून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं नेतृत्व असून, भाजपाकडून यावेळी भगवा फडकावण्याचा प्रयत्न आहे.मुंबई महापालिकेसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा युती केली असून शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसही सोबत आहे. दुसरीकडे भाजपा आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना मुंबईत स्वतंत्र लढत आहे. यादरम्यान एक्झिट पोलचे आकडे समोर आले असून, यामध्ये सत्तेच्या चाव्या नेमक्या कोणाच्या हातात जातील यासंदर्भात अंदाज वर्तवण्यात आले आहेत.मुंबईत 227 जागांसाठी निवडणूक असून, सत्तेत येण्यासाठी 114 चं बहुमत गाठावं लागणार आहे. एक्झिट पोलचे अंदाच पाहता मुंबईत भाजपा-शिवसेना म्हणजेच महायुतीची सत्ता येण्याची शक्यता आहेसर्व एक्झिट पोलमध्ये भाजपा आणि एकनाथ शिदेंची शिवसेना एकहाती सत्ता मिळवेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जर एक्झिट पोलचा अंदाज खरा ठरला तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा फार मोठा धक्का असणार आहे. तसंच हा निकाल सत्यात उतरल्यास महायुती पहिल्यांदाच मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करेल आज मतदान मोजणी नंतर निकाल हाती आल्यानंतरच आता खरं चित्र स्पष्ट होईल आणि एक्झिट पोलचे आकडे कितपत योग्य आहेत हे स्पष्ट होईल




