
मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरातील बाजारपेठांमध्ये उत्साहाचे वातावरण
हिंदू धर्मातील वर्षातील पहिला आणि अत्यंत महत्वाचा सण असलेल्या मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरातील बाजारपेठांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवार दि. १४ जानेवारी रोजी संक्रांती साजरी केली जाणार असून, त्यासाठी आवश्यक साहित्यांच्या खरेदीसाठी नागरिकांनी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
शहरातील मारूती मंदिर परिसर, गोखले नाका, धनजी नाका तसेच प्रमुख रस्त्यांवरील बाजारपेठांमध्ये सोमवारी सकाळपासूनच ग्राहकांची वर्दळ वाढली होती. संक्रांतीसाठी लागणार्या वाण, हळदीकुंकू, तिळगुळ तसेच रानमेव्याच्या खरेदीसाठी महिलांची विशेष गर्दी पहायला मिळत आहे. त्यामुळे बाजारपेठेत चैतन्य निर्माण झाले असून छोट्या व्यावसायिकांमध्ये उत्साह संचारला आहे.
www.konkantoday.com




