कै. बाबूराव जोशी गुरुकुलमध्ये यावर्षी कोस्टल ट्रेकचे आयोजन


शहरातील जी. जी. पी. एस. प्रशालेच्या कै. बाबूराव जोशी गुरुकुल प्रकल्पातर्फे प्रतिवर्षी विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन केले जाते. गुरुकुलमधील विविध उपक्रमांपैकी ट्रेकिंग हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. यावर्षी प्रथमच विद्यार्थ्यांनी नेहमीच्या ट्रेकपेक्षा वेगळ्या अशा कोस्टल ट्रेकिंगचा अनुभव घेतला.
यावेळी मुलांना खूप काही नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. समुद्र किनाऱ्याची सफर, वाळूचे विविध प्रकार, स्थलांतरीत पक्षी, किनाऱ्यावरील किंवा पाण्यातील विविध वनस्पती, विविध प्रकारचे शिंख शिंपले तसेच समुद्राच्या लाटा आपटल्याने तयार झालेले दगडाचे विविध प्रकार, जेलीफिश या सर्वांची माहिती घेत घेत इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी 6.2 किमीचा हा टप्पा अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने पार केला.
गुरुकुलमधील सर्व शिक्षकांनी यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले. या ट्रेकची ही अभिनव संकल्पना गुरुकुल विभाग प्रमुख श्री. वासुदेव परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच जी.जी.पी.एस. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनाली पाटणकर व र. ए. सोसायटीचे सर्व पदाधिकारी यांच्या सहकार्याने पार पडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button