भारताचा डीएनए मोडीत काढण्याचं विद्वेषाचे काम इंग्रजांनी केलं.

नवीन शैक्षणिक पॉलिसीतून पुर्नस्थापित करण्याचे काम सरकारने केले... ज्येष्ठ विचारवंत पद्मश्री दादा इदाते यांचे प्रतिपादन

दापोली

भारताचा डीएनए मोडीत काढण्याचं विद्वेषाचे काम हे इंग्रजांच्या व्यवस्थेने इंग्रजांच्या शिक्षणाच्या धोरणाने केलं केलं होतं याच इंग्रजांच्या व्यवस्थेविरोधात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, भारतरत्न महर्षी कर्वे या सगळ्यांनी लढा उभारला आणि ही सगळी नररत्ने महाराष्ट्रातली कोकणातली होती. त्यानंतर आता इंग्रजांच्या शैक्षणिक धोरणानंतर आता आपल्या सरकारने नवीन शैक्षणिक धोरण आणून भारताचा डीएनए पुर्नस्थापित करण्याचे काम हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने नवीन शैक्षणिक धोरणाच्या तसेच विविध सामाजिक कामाच्या माध्यमातून केल्याचे असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत पद्मश्री दादा इदाते यांनी केले. मराठी पत्रकार परिषद संघटनेच्या वतीने रामराजे महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. दापोली तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या २०२६ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन सहा जानेवारी पत्रकार दिनाच्या निमित्ताने रामराजे महाविद्यालय येथील विशेष कार्यक्रमात पद्मश्री दादा इदाते ,नगराध्यक्ष कृपाताई घाग , राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेविका साधना बोत्रे, प्राचार्य अशोक निर्बाण, रामराजे महाविद्यालयाच्या संचालिका स्मिताली राजपुरे, जालगावचे सरपंच अक्षय फाटक , दशानेमा गुजर युवक संघटना दापोलीचे अध्यक्ष डॉ .कुणाल मेहता, ज्येष्ठ पत्रकार जगदीश वामकर, प्रसाद रानडे तालुका संघटनेचे अध्यक्ष शैलेंद्र केळकर आदी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले.

ते पुढे म्हणाले की या सगळ्या विरोधात आपल्या स्वातंत्र्यवीरांनी भूमिका घेतली आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण सुरू केलं व त्यानंतर लोकमान्य टिळकांचा केसरी बाबासाहेबांनी 1920 साली मूकनायक त्यानंतर बहिष्कृत भारत ही दोन वृत्तपत्र काढली व त्याला श्री संत तुकाराम व श्री संत ज्ञानदेव यांच्या ओवीशी जोडले. ही आपली भारतीय ज्ञानपरंपरेची संत परंपरेची संस्कृती आहे. यानंतर अनेक उदाहरणे देत स्वातंत्र्य पूर्वीचा भारत व स्वातंत्र्य नंतरचा भारत यावर त्यांनी भाष्य केलं. डॉ.इरावती कर्वे यांनी मानवाच्या कवटीचा अभ्यास करून सगळ्या मानवाची कवटी एकच आहे असं सांगत जातीव्यवस्था संपुष्टात आणणारा निष्कर्ष मांडला. या सगळ्याचा अभ्यास पत्रकारांनी करायला हवा असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. दादा इदाते पुढे म्हणाले की, सामाजिक समरसतेचे भान ठेवून पत्रकारांनी काम करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पद्मश्री दादा इदाते यांनी अनेक इतिहासातील उदाहरणे देऊन या प्रसंगी केले. घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर , असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांचा जाज्वल्य इतिहास दापोली तालुक्याला आहे या सर्वांची आठवण ठेवून पत्रकारांनी या सगळ्याचा अभ्यास करून सत्य जगासमोर आणणे ही काळाची गरज असल्याचं मतही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

या कार्यक्रमावेळी मराठी पत्रकार परिषदेच्या अजित सुर्वे ,अजित मोरे ,सलीम रखांगे , सिद्धेश शिगवण, तेजस बोलघरे आणि राधेश लिंगायत या पत्रकारांचा मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी दापोली अर्बन बँकेचे व्यवस्थापक संभाजीराव थोरात , प्राचार्य अशोक निर्माण रामराजेच्या संचालिका स्मिताली राजपुरे दापोली तालुका मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शैलेंद्र केळकर , पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष जगदीश वामकर ,जेष्ठ पत्रकार प्रसाद रानडे ,डॉ.प्रशांत परांजपे ,कवयित्री रेखा जेगरकल आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. पत्रकार दिनानिमित्त दापोलीतील पत्रकारांचाही रामराजे महाविद्यालयाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक कुणाल मंडलिक यांनी केले प्रास्ताविक पत्रकार बंटी कांबळे व ऋणनिर्देश परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार पत्रकार प्रसाद रानडे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला दापोली तालुक्यातील मराठी पत्रकार परिषदेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button