सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाला ‘नाईट लँडिंग’ची मंजुरी! आता 24 तास विमानसेवा शक्य


कोकणच्या शिरपेचात आज मानाचा तुरा रोवला गेला आहे. सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाने नागरी विमान वाहतूक क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) चिपी विमानतळाला आयएफआर लायसन्स आणि ऑपरेशन्ससाठी हिरवा कंदील दिला आहे.या मंजुरीमुळे आता या विमानतळावर रात्रंदिवस आणि कोणत्याही ऋतूमध्ये सुरक्षित विमान उतरवणे शक्य होणार आहे.

राणेंच्या पाठपुराव्याला मोठे यश

चिपी विमानतळावर ‘नाईट लँडिंग’ची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी खासदार नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी आणि नाईट लँडिंगसाठी आवश्यक असणारा अद्ययावत विद्युत पुरवठा करण्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि नितेश राणे यांनी विशेष प्रयत्न केले.

विशेष म्हणजे, जिल्हा नियोजन समितीमधून अडीच कोटी रुपयांचा निधी या कामासाठी उपलब्ध करून देण्यात आला होता. या निधीमुळे वीज पुरवठ्याचे काम वेळेत पूर्ण झाले आणि आज डीजीसीएने अंतिम मंजुरी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button