
खेड तालुक्यातील भरणे येथे डोक्यात दगड घालून दुखापत, दोघांवर गुन्हा
खेड तालुक्यातील भरणे येथे मागील भांडणाचा राग मनात धरून एकाच्या डोक्यात दगड घालून दुखापत केल्याप्रकरणी अनिकेत साळुंखे आणि अजिंक्य साळुंखे (रा. भरणे-आठवडा बाजार) यांच्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सनी नारायण भोसले (२६, रा. भरणे) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. ते आपल्या ताब्यातील दुचाकीने खेड ते भरणे असा प्रवास करत असताना डोक्यात दगड घालून दुखापत केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
www.konkantoday.com




