सेंद्रिय खत निर्मिती कारखान्याला आग ,मोठे नुकसान

रत्नागिरी शहराजवळील माजगाव -करबुडे मार्गावर वेतोशी फाटा येथे सेंद्रिय खत निर्मिती करणार्‍या कारखान्यातील भुशाला आग लागली.
हा प्रकार काल घडला. रत्नागिरी नगर परिषदेच्या अग्निशामक यंत्रणेने ही आग विझवण्यात यश मिळवले.या आगीत कारखान्याचे मोठे नुकसान झाले या कारखान्यात आंब्याच्या बाटापासून सेंद्रिय खत निर्मिती केली जाते. त्यासाठी आंब्याच्या बाटांपासून भुसा तयार करणेत येतो या भूशालाच अचानक आग लागली. कामगारांनी ही आग विझवण्याचाप्रयत्न केला परंतु आग आटोक्यात येत नसल्याने रत्नागिरी नगरपरिषदेच्या अग्निशामक यंत्रणेला बोलाविण्यात आले. अग्निशमन यंत्रणेचे संदीप शिवलकर ,संतोष भोजने, सुधाकर कांबळे आदींनी व इतरांनी ही आग आटोक्यात आणली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button