भाजपला जागा सन्मानजनक, विराट विजय- अनिकेत पटवर्धन

भाजपाचे ३६ उमेदवार, २ नगराध्यक्ष विजयी
समन्वय राखून महायुती टिकवली

रत्नागिरी :
रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीमध्ये योग्य तो समन्वय राखून भाजपाला सन्मानजनक मिळवून देण्याकरिता प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले. रत्नागिरी जिल्ह्यात भाजपच्या ३९ उमेदवारांपैकी ३६ विजयी झाले असून २ पैकी २ ठिकाणी नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. तसेच महायुतीमध्ये भाजपने ९ उमेदवार शिवसेनेतर्फे उभे केले होते. त्यातील ७ जण विजयी झाले आहेत. अशा प्रकारे महायुतीत समन्वय राखून रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीचा विराट विजय साकारला गेला असून अशी प्रतिक्रिया श्री. अनिकेत पटवर्धन यांनी व्यक्त केली.

रत्नागिरी नगरपरिषद निवडणूक मतमोजणीप्रसंगी त्यांच्याशी संवाद साधला. भाजपाला जागा कमी देण्यात आल्याची टीका केली जात होती. परंतु काही जण उगाचच पक्षाची नाहक बदनामी करत होते. परंतु जागा वाटपात दूरदृष्टी ठेवली. भाजपाचा विचार करून आणि २०२९ च्या विविध निवडणुकीत विजय मिळवायचे लक्ष्य ठेवून श्री. अनिकेत पटवर्धन यांनी मोठी खेळी केली. सत्तेत सहभाग असेल तर सगळे होईल, पक्षाचा सन्मान होईल. त्यामुळेच मंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेवून जागांचे वाटप करण्यात आले आहे. भविष्यात कोकणात नक्की भाजपा वाढणार आहे. काहीही झाले तरी २०२९ ची लोकसभा, २ विधानसभा, कोकण पदवीधर निवडणूक, शिक्षक निवडणूक या सगळ्या गोष्टीचा दुरगामी विचार करून ही महायुती केली व ती यशस्वी ठरल्याचे श्री. अनिकेत पटवर्धन यांनी सांगितले.

रत्नागिरी जिल्ह्यात नगरपरिषद, नगरपंचायतीच्या एकूण १५१ जागा नगरसेवक पदाच्या आहेत. त्यात ३९ जागा भाजपला मिळाल्या. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वच ठिकाणी भाजपाची ताकद वाढली आहे. कोठेही ताकद कमी झालेली नसून किंवा भाजपाला कमी लेखण्यात आलेले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सर्व ठिकाणी महायुती अभेद्य आहे. सर्व ठिकाणी समन्वय ठेवण्याचे काम अनिकेत पटवर्धन यांनी केले आहे.

कोकणात भाजपाचा चांगले दिवस
२०२९ ला भाजप नक्की कोकणामध्ये खूप वाढलेले असेल, पक्षाला चांगले दिवस आलेले असतील. ४७ वर्षानंतर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक भाजप जिंकली, ही जागा कायम भाजपकडे राहावी, हा विचार श्री. अनिकेत पटवर्धन यांचा आहे. टीकाकारांनी अपप्रचार करू नये, असा इशारा त्यांनी दिला आहे. महायुती टिकवण्यासाठी श्री. अनिकेत पटवर्धन यांनी मोलाची भूमिका बजावल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.

भाजपा यंग ब्रिगेड, अनेकांचा प्रवेश होणार
भविष्यात भारतीय जनता पार्टी नवीन येणाऱ्यांना संधी द्यायचे ठरवले आहे. यापुढे यंग ब्रिगेडला संधी दिली जाईल. त्यामुळे भाजप पुढील २५ वर्षे चालेल, जुन्या व ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेऊन भाजप रत्नागिरीमध्ये नक्की वाढेल. २०२९ कोण कुठे असेल हे पण रत्नागिरीतील जनता बघेलच. तेव्हा दूरगामी पार्टीसाठी विचार केला हे कळेल. आगामी जिल्हा परिषद किमान १० जागा व पंचायत समितीसाठी २० जागा भाजपाचे सदस्य महायुतीच्या माध्यमातून विजयी होतील. भाजपाचा विचार करून हे केलं आहे, यात स्वार्थ नसून भविष्यात भाजपामध्ये अनेक लोक प्रवेश करतील, असा विश्वास श्री. अनिकेत पटवर्धन यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button