
दापोली तालुक्यातील लाडघर किनार्यावर वाळू शिल्प बनविण्याचे प्रशिक्षण
दापोली तालुक्यातील लाडघर येथे सोमवारी वाळू शिल्प बनवण्याच्या प्रशिक्षणासह वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. लाडघर समुद्रकिनार्याला मिळालेल्या ब्ल्यू फ्लॅग नामांकनाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने ग्रामपंचायतीच्यावतीने हा उपक्रम राबवण्यात आला. या प्रशिक्षणात शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविध कलाकृतींनी लक्ष वेधले.
समुद्रकिनार्यावरील वाळूचा वापर करून कला साकारणारे वाळू शिल्प विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी गुहागर येथून तीन कुशल वाळू शिल्पकारांना र आमंत्रित करण्यात आले होते. शिल्पकारांनी प्रथम विद्यार्थ्यांना वाळू शिल्प कला, आवश्यक तंत्र, पाण्याचा योग्य वापर, रचना आणि साकार करताना लक्षात ठेवावयाच्या बाबींवर मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी समुद्रकिनारी विविध सामाजिक, पर्यावरणीय व सांस्कृतिक संकल्पनांवर आधारित वाळू शिल्पे साकारली.www.konkantoday.com




