
खेड बसस्थानकाच्या मध्यवर्ती ठिकाणी पाणी झिरपत असलेल्या पाण्याचा शोध नाही
खेड बसस्थानकाच्या मध्यवर्ती ठिकाणी पाणी झिरपत आहे. हे नेमके पाणी येतेय कुठून, याचा सुगावाच लागत नसल्याने एसटी प्रशासन बुचकळ्यातच पडले आहे. झिरपणार्या पाण्यामुळे दलदल निर्माण झाली असून खड्ड्यांचा विस्तारही दिवसागणिक वाढत आहे. यामुळे चालकांना बस मार्गस्थ करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. येथील बसस्थानकात स्वच्छतेचा परता बोजवारा उडाला आहे.
प्रवेशद्वाराजवळील मुख्य ठिकाणी पाणी झिरपत आहे. आधीच जागोजागी पडलेल्या खड्यांमुळे बसचालक जेरीस आले आहेत. त्यात झिरपणार्या पाण्याची भर पडल्याने मनस्ताप आणखी वाढला आहे. झिरपणार्या पाण्यामुळे सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याबाबत एसटी प्रशासनाकडे तक्रारी केल्यानंतर बसस्थानकात झिरपणार्या पाण्याचा शोध घेण्यात आला असता थांगपत्ताच लागत नसल्याची बाब समोर आली आहे.www.konkantoday.com




