
रेवस-रेड्डी सागरी महामार्गावरील केळशी खाडी पुलाच्या कामाला वेग
रेवस-रेड्डी सागरी महामार्गावरील महत्वाच्या केळशी खाडी पुलाच्या बांधकामाने आता वेग घेतला आहे. दापोली तालुक्यातील केळशीत रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांना जोडणारा हा पूल पूर्ण झाल्यानंतर कोकणातील वाहतूक व्यवस्था तसेच पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे.
या पुलाला एकूण १५. खांब असणार असून सध्या केळशीकडील बाजूस अनेक खांबांचे फाऊंडेशन पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर खाडीच्या दुसर्या टोकाकडे म्हणजे साखरी गावच्या बाजूस पुलाच्या मार्गात येणारे कातळ मोठ्या प्रमाणात फोडण्याचे त्याचबरोबर सपाटीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. समुद्रसपाटीपासून उंची, भरती-ओहोटी, गाळ व पाण्याचा प्रवाह याचा अभ्यास करून उच दर्जाच्या आराखड्यानुसार बांधकाम सुरू आहे.
www.konkantoday.com




