फार्मासिटीकल कंपन्यांची मखलाशी जीएसटी कमी होताच मधुमेहींच्या औषधांची दरवाढ केली, रूग्ण त्रस्त


वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीच्या दरात केंद्र शासनाने नुकतीच काही प्रमाणात कपात केल्यानंतर जीएसटी महोत्सवाचा गवगवा करण्यात आला होता. मात्र त्यानंतर काही फार्मासिटीकल कंपन्यांनी प्रत्यक्षात औषधांच्या मूळ दरातच सुमारे दहा ते बारा टक्क्यांची वाढ केल्याने ग्राहकांचा पुरता भ्रमनिरास झाला आहे. मधुमेहाच्या औषधांच्या बाबतीत ही दरवाढ प्रकर्षाने दिसून येत आहे.
जीएसटीच्या दरात कपात झाल्यानंतर औषधांच्या बाबतीत रुग्णांना दिलासा मिळणार अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. तथापि सध्या वाढलेल्या व वाढत असलेल्या मधुमेही रुग्णांना औषधांच्या किंमतीत दिलासा सोडा उलट दरवाढीचा सामना करावा लागला आहे. फार्मासिटीकल कंपन्यांनी मधुमेहाच्या टॅब्लेटस् वा इन्सुलिनच्या दरात दहा ते बारा टक्क्यापर्यंत वाढ केल्याचे निदर्शनास आले आहे.
शंभर युनिटच्या इन्सूलिन क्युबची किंमत ४६९ रूपयांवरून थेट ५२५ रूपयांवर पोहोचली आहे. अशीच दरवाढ प्रत्येक महिन्यांला कमीअधिक प्रमाणात असंख्य औषधांच्या बाबतीत होत असल्याने जीएसटी बचत महोत्सवाचा थेट फायदा ग्राहकांना होण्याची अपेक्षा असताना फार्मासिटीकल कंपन्यांच्या मखलाशीमुळ सर्वसामान्य रुग्णांना उलट अनुभव येत आहे. औषधांच्या किंमतीच्या कंपन्यांच्या दरवाढीवर कोणाचे नियंत्रण आहे की नाही असा प्रश्न यामुळे उपस्थित माला आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button