
राजापूर तालुक्यातील राजापूर धारतळे मार्गावरील गिरमादेवी कोंडमध्ये आढळली जळालेल्या स्थितीत दुचाकी…
राजापूर तालुक्यातील राजापूर धारतळे मार्गावरील गिरमादेवी कोंड थांबा जवळ दुचाकी जळालेल्या अवस्थेत आढळून आली आहे. याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, एमएच ०४ जीडब्लू ६३५४ ही दुचाकी गिरमादेवी कोंड येथून १५ नोव्हेबर रोजी चोरीला गेली असल्याची तक्रार दत्ताराम तरळ यांनी राजापूर पोलीस ठाण्यात केली होती. जळालेल्या गाडीचा रंग पाहता तीच गाडी असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. जळालेली गाडी ही रविवार १६ नोव्हेंबर रोजी गिरमादेवी थांबा येथे रस्त्याच्या कडेला आढळून आली. या अनुषंगाने राजापूर पोलीस ठाण्यामध्ये अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.www.konkantoday.com




