वडाप चालकाच्या खूनप्रकरणी तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा


 मंडणगड तालुक्यातील तोंडली येथील राजाराम बाळकृष्ण चव्हाण (४७) या वडाप चालकास सोन्याच्या दागिन्यांसाठी भाड्याचे आमिष दाखवत धारदार सुर्‍याने त्यांचा खून करणार्‍या अभिजित सुधाकर जाधव (२७, गव्हे-दापोली), अक्षय विष्णू शिगवण (२८), नरेंद्र संतोष साळवी (२८, दोघेही रा. बोडिवली, दापोली) यांना येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने गुरूवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणी ३२ साक्षीदार तपासण्यात आले. ही घटना ऑक्टोबर २०१७ मध्ये घडली होती.
राजाराम चव्हाण यांचा वडापचा व्यवसाय होता. यातील तिघांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची सोनसाखळी मोडून पैसे मिळवण्याच्या हव्यासापोटी त्यांचा खून करण्याचा कट राचला. यासाठी साक्षीदार बालाजी निर्मळ यांच्या हरवलेल्या मोबाईलच्या सीमकार्डचा वापर करत एसएमएस पाठवला. तोंडी येथून टांगर येथे माणसे सोडायची आहेत, असा मेसेज एसएमएस पाठवत ०८ झेड १३८९ क्रमांकाच्या मॅजिक टाटा गाडीला भाडे असल्याचे आमिष दाखवले. मात्र त्यांनी जाण्यास नकार दिला. यानंतर तिन्ही संशयितांनी जप्त गुन्ह्यातील एमएच ०८ ए ६२३३ क्रमांकाच्या दुचाकीवरून ट्रिपल प्रवास करत चालकाच्या घरात घुसले. यानंतर धारदार सुर्‍यासह दगडाने ठेचून त्याचा खून केला. त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी व दोन मोबाईल हँडसेट हिसकावून घेतले. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांचा मृतदेह पुलाच्या खालील सिमेंट पाईपमध्ये टकून दिला.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button