
हास्यजत्रा फेम अभिनेता प्रभाकर मोरे यांची नॅब आय हॉस्पीटलला सदिच्छा भेट
कोकणातील नामांकित नॅब आय हॉस्पीटलला हास्यजत्रा फेम अभिनेता श्री. प्रभाकर मोरे यांनी आज सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी त्यांनी हॉस्पीटलच्या कार्याची सविस्तर माहिती जाणून घेतली.
नॅब आय हॉस्पीटलचे अध्यक्ष श्री. निलेश भुरण यांनी यावेळी सांगितले की, आतापर्यंत हॉस्पीटलमध्ये तब्बल ७८,००० मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या आहेत. तसेच अंधत्व प्रतिबंधन आणि उपचार या क्षेत्रात नॅब आय हॉस्पीटल कोकणातील एक अग्रगण्य संस्था असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या भेटीप्रसंगी श्री. प्रभाकर मोरे यांचा नॅबच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला नॅबचे कार्यवाह श्री. भरत नांदगावकर, चिपळूण भाजप शहराध्यक्ष श्री. शशिकांत मोदी, तसेच श्री. आंबेकर उपस्थित होते.
नॅब आय हॉस्पीटलच्या सामाजिक आणि आरोग्यविषयक कार्याचे प्रभाकर मोरे यांनी विशेष कौतुक करत आगामी काळात अशा उपक्रमांमध्ये सहकार्य करण्याची तयारी दर्शविली.




