
कर्नाटक सीमाप्रश्नी मोठी बातमी; महाराष्ट्राची मागणी सर्वोच्च न्यायालयाने केली मान्य, 8 वर्षांनी होणार सुनावणी
अनेक वर्षापासून भिजत पडलेल्या महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नी महत्वाची अपडेट समोर आली आहे. तब्बल आठ वर्षानंतर दोन राज्यातील सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राची मागणी मान्य केली असून, मूळ दाव्यावर पुढील वर्षी २१ जानेवारी २०२६ रोजी ही सुनावणी होणार आहे.
प्रलंबित सीमाप्रश्नी २०१७ मध्ये शेवटची सुनावणी झाली होती. त्यानंतर आता याबाबत सुनावणी होणार आहे. याप्रकरणी लवकर सुनावणी व्हावी, अशी विनंती महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात केली होती. ही विनंती न्यायालयाने मान्य केली आहे. न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यामूर्ती आलोक कुमार आराध्ये यांनी ही विनंती मान्य केली आहे. मूळ दाव्यावरच ही सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.




