चिपळूण तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी तिघांविरोधात फौजदारी गुन्हा


चिपळूण तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता करून ग्रामपंचायत निधीचा अपहार के ल्याच्या आरोपावरून तीन जणांविरोधात चिपळूण येथील अलोरे शिरगाव पोलीस ठाण्यात फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे ग्रामपंचायत स्तरावरील आर्थिक व्यवहारांबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
शिरगाव ग्रामपंचायतीत घरपट्टी, पाणीपट्टी आणि वीजकर वसुलीची जबाबदारी असताना वसूल केलेल्या रकमेपैकी १ लाख ४३ हजार ६९ रुपये ग्रामपंचायतीच्या बँक खात्यात जमा न करता सुमारे सात महिने स्वतःकडे ठेवल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी नीता निलेश शिंदे (वय ३३, रा. शिरगाव, पाटीलवाडी) यांनी तक्रार दाखल केली आहे. धनंजय दत्ताराम सोलकर (वय ३३), दिनेश दत्ताराम धागडे (वय ४२) आणि श्रीकृष्ण गंगाराम कदम (वय ५०), सर्व रा. शिरगाव, ता. चिपळूण, अशी आरोपींची नावे आहेत. शिरगाव ग्रामपंचायतीतील आर्थिक व्यवहारांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला असून, याप्रकरणी भारतीय दंड विधानाच्या कलम ४०८ व ३४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आल्याची नोंद आहे. या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासातून स्पष्ट होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button