कुवारबाव येथील कारवांचीवाडी परिसरातील बँकेच्या ताब्यातील सीलबंद फ्लॅटमध्ये बेकायदेशीर प्रवेश; दाम्पत्याविरोधात गुन्हा


रत्नागिरी : तालुक्यातील कुवारबाव येथील कारवांचीवाडी परिसरातील बँकेच्या ताब्यात असलेल्या सीलबंद फ्लॅटमध्ये बेकायदेशीर प्रवेश केल्याप्रकरणी एका दाम्पत्याविरोधात रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील संशयित आरोपी आसिया अब्दुल रशीद मुक्री (वय ४०) आणि अब्दुल रशीद मुक्री (वय ४८, रा. गुलाब वाटिका अपार्टमेंट, कुवारबाव) अशी असून, लोहीत जी. डी. यांनी याबाबत तक्रार दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रत्नागिरी यांच्या आदेशानुसार खेडशी येथील मंडळ अधिकाऱ्यांनी कुवारबाव येथील गुलाब वाटिका अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक १०३ चा कायदेशीर ताबा बँक ऑफ महाराष्ट्रच्या पाली शाखेला दिला होता. ताबा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित फ्लॅटला अधिकाऱ्यांकडून नियमानुसार सील लावण्यात आले होते.

मात्र, ३१ जानेवारी २०२६ रोजी आरोपींनी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता फ्लॅटचे सील आणि कुलूप तोडून आत प्रवेश केल्याचा आरोप आहे. या घटनेची तक्रार १३ जुलै २०२६ रोजी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली.

या प्रकरणी पोलिसांनी घरात बेकायदेशीर प्रवेश, मालमत्तेचे नुकसान, शासकीय आदेशाचे उल्लंघन आदी संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button