
मासे बंदी झाल्यामुळे खवय्यांना जाणवणार माशांची टंचाई
१ जूनपासून समुद्रातील मासेमारीवर बंदी आल्याने कोकणच्या किनारपट्टीवर आता खाडीतील माशांचा हंगाम सुरू झाला आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत मासळीची आवक अत्यंत कमी असल्याने माशांचे दर सध्या ’आकाशाला’ भिडले आहेत. वाढत्या दरांमुळे मासे खवय्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसत असून, अनेकांनी नाईलाजास्तव चिकनच्या दुकानांची वाट धरली आहे.
रत्नागिरीतील राजीवडा आणि मिरकरवाडा बंदरावर नेहमीच मासे खरेदीसाठी झुंबड उडते. मात्र, रविवारी बाजारात गेलेल्या खवय्यांना वाढलेल्या दरांचा मोठा धक्का बसला. पावसाळी वातावरणात आवडीने खाल्ले जाणारे खेकडे आता थेट ६०० रुपयांच्या घरात पोहोचले आहेत. तसेच, ताऊज, लेपी, सुळे कांटा आणि खाडीची कोळंबी यांसारख्या मासळीचे दर ५०० ते ६०० रुपये किलोपर्यंत वधारले आहेत. तिसरे किंवा मुळे यांसारख्या मासळीसाठीही १५० रुपये शेरापर्यंत मोजावे लागत आहेत.www.konkantoday.com




