
कॉम्रेड मॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण केलेल्याअभिजित पड्याळ आणि प्रसाद देवस्थळी यांचे भारतात आगमन; रत्नागिरीमधे स्वागताची जोरदार तयारी
कॉम्रेड मॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण केलेली प्रसाद देवस्थळी आणि अभिजित पड्याळ यांचे आज सकाळी आफ्रिकेतून भारतात सुखरूप आगमन झाले. रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे अध्यक्ष महेश सावंत यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले.
आज संध्याकाळी रत्नागिरीमध्ये त्यांचे भव्य स्वागत करण्यात येणार असून, यासाठी रत्नागिरीकर मोठ्या उत्साहात सज्ज झाले आहेत. सायंकाळी ६ वाजता साळवी स्टॉप येथे सर्व नागरिक जमणार आहेत.
सर्व कोकणवासीयांच्या वतीने साळवी स्टॉप येथे स्वागत सोहळा पार पडेल. त्यानंतर साळवी स्टॉप ते मारुती मंदिर अशी स्वागत फेरी आयोजित करण्यात आली आहे.
या स्वागत सोहळ्यासाठी रत्नागिरीतील सुजाण नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, विविध जिम प्रतिनिधी, पत्रकार, योगा ग्रुप्स तसेच फिटनेसविषयी जागरूक नागरिक सक्रिय सहभाग घेणार आहेत.
तसेच रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशन, रत्नागिरी जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन, बॅडमिंटन प्रेमी , पत्रकार संघ, विविध शिक्षक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरही उपस्थित राहून या दोघांचे स्वागत करणार आहेत.
हा सोहळा रत्नागिरीतील वाढत्या फिटनेस संस्कृतीचे प्रतीक ठरणार आहे.
सर्व रत्नागिरीकरांनी सायंकाळी ६ वाजता साळवी स्टॉप येथे उपस्थित राहून या ऐतिहासिक स्वागत सोहळ्याचा भाग करावे, असे आवाहन सर्व सुजाण रत्नागिरी वासियांतर्फे करण्यात येत आहे.




