
१५ जुलैपर्यंत इंदापूर ते तळगांवदरम्यान महामार्गावर संपूर्णपणे वृक्षलागवड करण्याची ग्वाही
गेल्या चार वर्षांपासून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वृक्षलागवडीसाठी सातत्याने संतप्त पाठपुरावा करूनही केवळ आश्वासने मिळाल्याने झालेल्या चिपळूणवासियांबरोबरच हायवे वृक्षलागवड हक्क समितीचे शहानवाज शाह यांनी शुक्रवारी महाराष्ट्र दिनी राष्ट्रीय महामार्ग उपविभाग कार्यालयासमोर थेट भूसमाधी आंदोलन छेडले आणि अखेर महामार्ग प्रशासनाला नमते घ्यावे लागले. १५ जुलैपर्यंत इंदापूर ते तळगांवदरम्यान महामार्गावर संपूर्णपणे वृक्षलागवड केली जाईल, अशी लेखी हमी देतानाच समितीच्या दहा मुद्यांचा मसुदाही महामार्ग विभागाने मान्य केला. परिणामी सुरू केलेले आंदोलन दुपारी तूर्तास स्थगित करण्यात आले.
महामार्गांवर इंदापूर ते तळगाव दरम्यान आयआरसीच्या नियमानुसार नियोजित वृक्षलागवड न झाल्याबाबत हायवे वृक्षलागवड हक्क समिती आणि पर्यावरणप्रेमी शाह यांनी अनेकवेळा बैठका, निवेदने व पाठपुरावा केला होता. मात्र प्रत्येक बैठकीत केवळ आश्वासने देऊन वेळकाढूपणा होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
शुक्रवारी महामार्ग कार्यालयासमोर चौपदरीकरणाचे काम सुरू असलेल्या ठिकाणीच पाच फुटाचा खड्डा खोदून शाह यांनी. उपोषण सुरू करताच परिसरात खळबळ उडाली. चिपळूणवासीय, पर्यावरणप्रेमी आणि विविध सामाजिक संघटनांसह राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनस्थळी हजेरी लावून पाठिंबा दिला. माजी उपनगराध्यक्ष बापू काणे, अरुण भोजने, राम रेडीज, किशोर रेडीज, उदय ओतारी, भरत लब्धे, बाळा कदम, पराग वडके, पंकज दळवी, मुबीन गोठे, मुराद अडरेकर, इब्राहीम दलवाई, तानू आंबेक आदी सहभागी झाले.www.konkantoday.com




