मालवण दांडी समुद्रात वॉटर स्पोर्टचा आनंद घेण्यासाठी उतरलेल्या एका महिलेचा आकस्मिक मृत्यू


मालवण दांडी समुद्रात वॉटर स्पोर्टचा आनंद घेण्यासाठी उतरलेल्या एका महिलेचा आकस्मिक मृत्यू झाला. महिला समुद्राच्या पाण्यात अत्यवस्थ झाल्याने तिला तात्काळ उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.
मालवण ठाणे-अंबरनाथ येथील मठकर कुटुंबीय पर्यटनासाठी येथे आले होते. रविवारी सकाळी दांडी किनार्‍यावर वॉटर स्पोर्टसूसाठी मठकर कुटुंबीय समुद्रात उतरले. वॉटर स्पोर्टसनंतर काही वेळात सौ. शीतल शशिकांत मठकर (४५) यांची प्रकृती बिघडली. त्यांना तात्काळ समुद्रातून बाहेर काढण्यात आले. याचवेळी पर्यटनासाठी आलेल्या एका डॉक्टरने मठकर यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू केले. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button