भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार प्रमोद जठार यांचे खेडमध्ये जंगी स्वागत

खेड : कोकणचे सुपुत्र तथा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रमोद जठार यांची महाराष्ट्र विधानपरिषद सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्यानंतर खेड शहरात त्यांचे उत्साहात जंगी स्वागत करण्यात आले.
भाजपा नेते व माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत फटाक्यांची आतषबाजी केली. त्यानंतर शासकीय विश्रामगृह (डाक बंगला) येथे प्रमोद जठार यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधला.
यावेळी बोलताना उपस्थित पदाधिकाऱ्यांनी प्रमोद जठार यांच्या निवडीमुळे पक्ष नेतृत्वाने कोकणाला मोठी संधी दिल्याची भावना व्यक्त केली. त्यांच्या अनुभवाचा फायदा कोकणाच्या विकासासाठी होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
या स्वागत समारंभाला जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, दक्षिण तालुकाध्यक्ष विनोद चाळके, शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, ज्येष्ठ नेते राजूभाई रेडीज, अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष तथा गटनेते रहीमभाई सहिबोले, नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर, स्वप्नाली राकेश चव्हाण, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस ॲड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, राजेश जोयसर, राहुल पाटणे, माजी नगराध्यक्षा उर्मिला उदय पाटणे-शेट्ये, माजी नगरसेविका आशा सनगरे, अक्षय सनगरे, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, मंदार आपटे, विजय गुप्ता, ओवेस चौगुले, प्रणव मापुस्कर, स्वराज गांधी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button