
पॉवरहाऊस नाका परिसरात वाहतूक नियमभंगावर कारवाई
चिपळूण : पॉवरहाऊस नाका येथील सर्व्हिस रोडवर वाहनांची अनधिकृत पार्किंग केल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याबाबत तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार मंगळवारी (दि. १२ मे २०२६) पोलिसांनी विशेष कारवाई मोहीम राबविली.
मा. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बेले व चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. फुलचंद मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली पोहेकॉ/७११ नाळे, पोहेकॉ/१२२२ सकपाळ व पोकॉ/८८३ वागदकर यांनी संबंधित ठिकाणी भेट देऊन सर्व्हिस रोडवर उभ्या असलेल्या ६ वाहनांवर कारवाई केली. या कारवाईत एकूण ६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
यावेळी संबंधित वाहनमालकांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून भविष्यात सर्व्हिस रोडवर वाहने उभी न करण्याच्या सूचना देण्यात आल्या.




