पश्चिम बंगाल व आसाम येथील निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशाबद्दल भाजप रत्नागिरी कार्यालयात करण्यात आला जल्लोष


रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालय येथे पश्चिम बंगाल व आसाम येथील निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशाबद्दल जल्लोष करून आनंद उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत विजयाचा आनंद व्यक्त केला. फटाके फोडून, मिठाई वाटप करून आणि घोषणाबाजी करत वातावरण उत्साहपूर्ण झाले होते.
यावेळी बोलताना कार्यकर्त्यांनी सांगितले की, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर जनतेने पुन्हा एकदा विश्वास दाखवला असून विकासाच्या राजकारणाला मत दिले आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातही पक्ष अधिक बळकट होत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. यासोबतच रवींद्र चव्हाण (प्रदेशाध्यक्ष) आणि जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना अधिक मजबूत होत असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
या कार्यक्रमास शहरातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहराध्यक्ष दादा ढेकणे, मनोज पाटणकर, ऋषिकेश केळकर, निलेश आखाडे, संदीप सुर्वे, मानसी करमरकर, भक्ती दळी,सुप्रिया रसाळ, अशोक वाडेकर, संदीप रसाळ, नितीन गांगण, मंदार भोळे, नितीन जाधव, प्रसाद बाष्ठे, मोहन पटवर्धन, संकेत कदम,अथर्व सावंत,समीर वस्ता, अवधूत लिंगायत,वरद लिमये आदी उपस्थित होते..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button