देवरुख-रत्नागिरी मार्गावरील पाटगाव घाटीत रखडलेल्या रस्त्याचे डांबरीकरण सुरू


दोन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर देवरुख-रत्नागिरी मार्गावरील पाटगाव घाटीत रखडलेल्या रस्त्याचे डांबरीकरण काम हाती घेण्यात आले. मात्र एका दिवसातच खडी उखडू लागली आहे. हे काम नित्कृष्ट दर्जाचे झाल्याने वाहन चालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
देवरुख-रत्नागिरी हा मुख्य मार्ग असून वाहनांची सदैव रेलचेल सुरू असते. वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता देवरुख ते पांगरी या मार्गाचे रुंदीकरण व डांबरीकरण करण्यात आले. पाटगाव घाटीत ५०० मिटरचे काम वादाच्या भोवर्‍यात सापडल्याने अर्धवट स्थितीत होते. यामुळे अनेक अपघात देखील घडले. ही जागा खासगी की शासकीय असा मुद्दा उपस्थित झाला होता. या प्रकरणावर तोडगा पडल्यानंतरही दोन वर्षे काम अर्धवट स्थितीत होते. सार्वजनिक बांधकाम विभागाला डांबरीकरण कामाचा मुहूर्त सापडत नव्हता.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button