
खताचा काळाबाजार रोखण्यासाठी कृषी विभागाने पथके तैनात केली.
स्थानिक शेतकरी वर्गाला पुरेसे खत मिळावे, यासाठी कृषी विभागाकडून ठोस पावले उचलण्यात आली आहेत. यात प्रामुख्याने खताचा होणारा काळाबाजार रोखण्यासाठी कृषीकडून स्वतंत्र पथक तैनात करण्यात येणार आहेत. ही पथके ठिकठिकाणी तपासणी केंद्रावर कार्यरत राहाणार आहेत.
चिपळूण तालुक्यात खरीप हंगामात दरवर्षी हजार मेट्रिक टनांहून अधिक सुरिया खताची मागणी असताना कंपन्यांकडून मात्र ५०० ते ७०० मेट्रिक टन पुरवठा केला जातो हे खत ग्रामीण भागातील सोसायट्या तालुका खरेदी-विक्री संघ यासह २५ वितरकांमार्फत विकले जाते. मात्र काही वितरकांकडून साठेबाजी करून दरवाढ करून खत विक्री केली जाते. तसेच शेतकर्यांऐवजी काही ठिकाणी औद्योगिक वापरासाठी खताची अनधिकृत विक्री होत असल्याच्या तक्रारी आहेत.
www.konkantoday.com




