स्वयंरोजगारातून ६३ दिव्यांग होणार आत्मनिर्भर, १८ लाखांच्या निधीचे वाटप


रत्नागिरी शासनाच्या योजना ग्रामीण भागातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून रत्नागिरी पंचायत समितीने एक महत्वाचे पाऊल उचलले आहे. पंचायत समितीच्या सेस फंडातून तालुक्यातील दिव्यांग ६३ लाभार्थ्यांना स्वंयरोजगारासाठी सुमारे १८ लाख रुपयाच्या निधीचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती सभापती प्रवीण पांचाळ यांनी दिली. सोमवारी पंचायत समितीत आयोजित विशेष कार्यक्रमात तालुक्यातील ६३ दिव्यांग लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची छाननी पूर्ण करण्यात आली. यावेळी उपसभापती गजानन धनावडे, अधिकारी आणि मोठ्या संख्येने तालुक्यातील लामार्थी उपस्थित होते.
या लाभार्थ्यांना १५ हजार ते ६० हजार रुपयांपर्यंतच्या वस्तूचा लाभ देण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने झेरॉक्स मशीन्स- १७ लाभार्थी, शिलाई मशीन्स- ९ लाभार्थी, घरघंटी – ३७ लामार्थी यांचा समावेश आहे. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कोणतेही पक्षीय राजकारण न आणता केवळ गरजू व्यक्तींची निवड करण्यात आली आहे. पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार प्रत्येक मागणीदाराचा यात समावेश केला आहे. कोणालाही वंचित ठेवण्यात आले नसल्याचे पांचाळ यानी स्पष्ट केले. गटविकास अधिकारी चेतन शेळके म्हणाले, छाननीनंतर लामार्थ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा केले जातील लाभार्थ्यांनी संबंधित वस्तू खरेदी केल्यानंतर त्याचे फोटो पंचायत समितीकडे जमा करणे अनिवार्य आहे खरेदी केलेल्या वस्तूची अधिकृत अधिकार्‍यामार्फत प्रत्यक्ष पाहणीदेखील केली जाईल.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button