भाट्ये किनार्‍यावर हंगामातील पहिल्या कासवांच्या ५० पिल्लांची समुद्रात झेप


रत्नागिरी शहरानजीकच्या भाट्ये समुद्रकिनार्‍यावर या हंगामातील कासवांच्या पहिल्या घरट्यातून बाहेर आलेल्या ५० हून अधिक पिल्लांना सुरक्षितपणे समुद्रात सोडण्यात आले. सोमवारी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या पर्यटकांना आणि नागरिकांना निसर्गाचा हा एक आगळावेगळा सोहळा पहायला मिळाला.
भाट्ये समुद्रकिनार्‍यावर सुरू असलेल्या संरक्षणात्मक बंधार्‍याच्या कामाचा मोठा परिणाम कासवांच्या विणीच्या हंगामावर झाल्याचे यावर्षी दिसून आले. किनार्‍यावरील जेसीबी आणि इतर अवजड यंत्रणांच्या कंपनांमुळे कासवांनी अंडी देण्यासाठी किनार्‍याकडे येणे टाळले. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा केवळ दोनच घरटी संरक्षित करण्यात कासवमित्रांना यश आले आहे. एरवी एका हंगामात कासव तीनवेळा अंडी देण्यासाठी येते, मात्र यावर्षी या नैसर्गिक प्रक्रियेत मोठा अडथळा निर्माण झाला आहे. वनविभाग, कांदळवन कक्ष आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने कासव असतानाही त्यानी यावर्षी दोन घरटी संवर्धन करीत आहे. प्रतिकूल परिस्थिती सुरक्षित केली होती.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button