मत्स्य महाविद्यालय कोकण कृषी विद्यापीठाशी संलग्न असणे गरजेचे- कुलगुरू डॉक्टर संजय सावंत

दापोली -डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे रत्नागिरी शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालय हे याच विद्यापीठाशी संलग्न असणे गरजेचे आहे ते नागपूर येथील मस्य महाविद्यालयाशी जोडणे योग्य होणार नाही असे स्पष्ट मत डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले याबाबत राज्यपाल महोदयांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉक्टर प्रमोद सावंत, संशोधक संचालक डॉक्टर पराग हळदणकर ,शिक्षण संचालक डॉक्टर नारखेडे ,विस्तार हद्द संचालक डॉक्टर संजय भावे आदी उपस्थित होते. मत्स्य महाविद्यालय शाखेच्या विद्यार्थ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही त्यांच्या डिग्रीच्या ग्राह्य तेवर कोणतेही प्रश्नचिन्ह उपस्थित राहणार नसल्याचे ‍त्यांनी स्पष्ट केले आहे.

Related Articles

Check Also
Close
Back to top button