अक्कलकोट येथील पादुका परिक्रमा पालखी उद्या रत्नागिरीत दाखल होणार

रत्नागिरी : अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराज अन्नछत्र यांच्या वतीने पादुका परिक्रमा पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ही पालखी रत्नागिरी शहरातील नाचणे येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात उद्या (१८ फेब्रुवारी) सायंकाळी ५ वाजता दाखल होणार आहे. ७ वाजता आरती झाल्यानंतर सर्व भाविकांसाठी दर्शनासाठी उपलब्ध राहणार आहे.
गुरुवारी (१९ फेब्रुवारी) पहाटे ५.३० ते ६ यावेळेत अभिषेक आणि ६ ते ८ यावेळेत दर्शन घेता येणार आहे.
सभासद, सेवेकरी व भाविकांनी सेवेमध्ये सहभागी होऊन दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. बुधवारी सायंकाळी येताना मांदियाळीसाठी सुकी भाजी व पोळी, तसेच अभिषेकासाठी येताना दूध व केळी घेऊन यावीत, अशी सूचना करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button