
रत्नागिरी जिल्ह्यातील 56 जि.प.गट व 112 पं.स.गणांमध्ये राजकीय रणसंग्राम रंगणार
राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे अखेर बिगुल वाजले आहे. यामुळे जिल्ह्यातील 56 जि.प.गट व 112 पं.स.गणांमध्ये राजकीय रणसंग्राम रंगणार आहे. युती आणि आघाडी याबाबत अजूनही संभ्रमावस्था आहे. बहुसंख्य ठिकाणी सर्वच पक्षांचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. यामुळे या निवडणुकीत बंडखोरीची शक्यता जास्त असणार आहे.
एकंदरित रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये पडलेल्या जातीय आरक्ष्ाणानुसार 7 गट हे नागरिकांचा मागासप्रवर्ग, 8 गट हे नागरिकांचा मागास वर्ग स्त्री, 1 गट अनुसूचित जाती तर 2 गट हे अनुसूचित जातीजमाती स्त्री साठी दाखल झाले आहे. जिल्हाभरातील 56 गटापैकी 18 गट हे राखीव झाल्याने टक्केवारीत हे प्रमाण 32 टक्के इतकेच आहे. यामुळे रत्नागिरी जिल्हा परिषदेने ही जातीय आरक्ष्ाणाची मर्यादा ओलांडली नसल्याचे दिसत आहे.




