
दहापेक्षा अधिक मोटार गाड्या अथवा वाहने वापरण्यास निर्बंध
रत्नागिरी, दि. 6 ) : कोणत्याही वाहनाच्या ताफ्यामध्ये दहापेक्षा अधिक मोटार गाड्या अथवा वाहने वापरण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (आचारसंहिता कालावधीत) निर्बंध घालीत असल्याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक 2025 साठीचा कार्यक्रम दि. 4 नोव्हेंबर रोजी घोषीत केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. निवडणूक आयोगाने त्यांच्या निर्देशानुसार कोणत्याही परिस्थितीत सुरक्षेसाठी असलेल्या मोटारगाड्या / वाहने यांच्या ताफ्यात दहा पेक्षा अधिक वाहने नसावीत असे निर्देश दिले आहेत, जिल्ह्यात नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूकीची संपूर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन कोणत्याही राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी दहा पेक्षा अधिक मोटार गाड्या / वाहनांच्या ताफ्याचा वापर करण्यास प्रतिबंध घालणे बाबत खात्री झाल्याने जिल्हादंडाधिकारी श्री. जिंदल यांनी राज्य निवडणूक आयोगाकडील दि. 04 नोव्हेंबर 2025 रोजीचे आदेशान्वये देण्यात आलेल्या निर्देशास अनुसरुन तसेच भारतीय नागरिक सुरक्षा संहीता, 2023 चे कलम 163 अन्वये त्यांना प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन कोणत्याही वाहनाच्या ताफ्यामध्ये दहापेक्षा अधिक मोटार गाड्या अथवा वाहने वापरण्यास आचारसंहिता कालावधीत निर्बंध घातले आहेत.
तसेच प्रत्येक इसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनी क्षेपकावर पोलीस विभागाने जाहीर करुन त्यास प्रसिध्दी करावी असेही आदेशात म्हटले आहे.
0000




