चिपळूण शहरातील वाशिष्ठी नदी होतेय मलीन, शौचालयांचा मैला, सांडपाणी थेट वाशिष्ठी पात्रात


चिपळूण शहरातून धावणार्‍या वाशिष्ठी व शिवनदीच्या काठावर अनेक सार्वजनिक व खाजगी शौचालये बांधण्यात आली आहेत. त्याचे सांडपाणी नद्यांमध्ये सोडण्यात आले आहे. यामुळे पाणी दुषित होत असतानाच आता बाजारपूल व मच्छि मटण मार्केटमधील नादुरूस्त शौचालयाचा मैला व सांडपाणी वाशिष्ठी नदीत जात असल्याचे उघडकीस आले आहे. यावर नगर परिषद करीत असलेली दुरूस्ती तकलादू असल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शहराचा विचार करता दोन नद्या शहरातून वाहतात. काही वर्षे मागे जाता या दोन्ही नद्यांच्या पात्रात घाणीचे साम्राज्य दिसत होते. चिकन, मटणचे टाकावू अवशेष, कचरा, प्लास्टिकच्या बाटल्यांचा खच दिसून येत आहे. यामुळे वाशिष्ठीच्या पाण्याला दुर्गंधी येत असल्याने शहरात अनेकदा साथीचे आजार पसरले होते. ही परिस्थिती बदलण्यासाठी नगर परिषदेसह काही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला. यातून शिवनदीच्या पुलावर जाळी मारण्यात आली तर वाशिष्ठीत कचरा टाकणार्‍यांवर कारवाई सुरू झाली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button