
रेल्वे गाडीत चढत असताना महिलेचे दीड लाखांचे दागिने लंपास.
खेड. – खेड रेल्वेस्थानकात दाखल झालेल्या रेल्वेगाडीत चढत असताना अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा उठवत १ लाख ३० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने असलेली पर्स लांबवली. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, गुरुवारी सायंकाळी येथील पोलीस ठाण्यात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. समृद्धी संदेश साळुंखे (२६, मूळ गाव तळे-मांडवे, सध्या नायगाव-पालघर) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार. नोंदवली. २२ जून रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास फलाट क्रमांक १ वर दाखल झालेल्या रेल्वेगाडीत चढत होत्या. रेल्वेगाडीत शिरल्यानंतर दागिन्यांची पर्स चोरीस गेल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाणे गाठत रितसर तक्रार नोंदवली.www.konkantoday.com