
आगामी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रारुप यादीतील ७,५०० हरकतींवर सुनावणी पूर्ण
आगामी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहराच्या प्रारुप मतदार यादीवर दाखल झालेल्या हरकतींवर कार्यवाही पूर्ण केली आहे. ही यादी प्रसिद्ध केल्यानंतर सुमारे ७,५०० मतदारांवर विविध कारणांनी हरकती दाखल करण्यात आल्या होत्या. न.प. प्रशासनाने दाखल हरकतींचा अभ्यास करून अनेक ठिकाणी स्थळ पाहणी केली आणि त्यानुसार यादीत दुरुस्ती सुचवली. यातील सुमारे ३५० मतदारांवर आक्षेप असल्याने त्यांना नोटीसा बजावून सुनावणी पूर्ण झाली.
रत्नागिरी शहर मतदारांची अंतिम यादी ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. यामुळे निवडणुकीपूर्वी मतदारांची अचूक संख्या निश्चित होणार असून राजकीय पक्षांच्या रणनितीला गती मिळणार आहे नगर परिषदेने प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केल्यानंतर सुमारे ७,५०० मतदारांवर विविध कारणांनी हरकती दाखल करण्यात आल्या होत्या.
www.konkantoday.com




