
देवरूख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईनमध्ये ‘मध्ये कला प्रदर्शन.
देवरूख येथील कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईनमध्ये १६ फेब्रुवारी रोजी रंगसंगती या संकल्पनेनुसार वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन सायंकाळी चार वाजता होणार आहे. या वेळी कलारसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्य रणजीत मराठे यांनी केले आहे.या प्रदर्शनानिमित्त प्रसिद्ध कलाकार रूपेश पाटील, जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे प्राध्यापक आणि प्रख्यात कलाकार प्रफुल्ल सातोकर, नेहरू सेंटर आर्ट गॅलरीचे सहाय्यक संचालक संतोष पेडणेकर, अजय पित्रे, भारती पित्रे, प्राचार्य रणजीत मराठे, जितेंद्र पराडकर, विष्णू परीट आदी उपस्थित राहणार आहेत.
या प्रसंगी डी-कॅड पुरस्कृत ‘कलागौरव पुरस्कार २०२५ हा पुरस्कार कलाशिक्षक जितेंद्र पराडकर यांना तर राज्य कला पुरस्कार प्राप्त चित्रकार विष्णू परीट यांना देवरूख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईन यांच्यावतीने सन्मानित करण्यात येणार आहे. वार्षिक स्नेहसंमेलन २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ ते १०वाजता होईल. या सर्व कार्यक्रमांना कलारसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्य रणजीत मराठे यांनी केले आहे.