
‘आम्ही साहित्यप्रेमी’ च्यावतीने २५ एप्रिलला ओरोसला कथाकथन.
सिंधुदुर्गनगरी, दि. १८: ‘घुंगुरकाठी’प्रणित ‘आम्ही साहित्यप्रेमी’च्यावतीने शुक्रवार, २५ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता कथाकथन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ओरोस खर्येवाडी येथील दत्तराज सोसायटीच्या सांस्कृतिक सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.’आम्ही साहित्यप्रेमी’ व्यासपीठाचा हा तिसरा मासिक कार्यक्रम असून तो सर्व रसिकांना खुला आहे. या कार्यक्रमात पुढील रसिक कथाकथन करणार आहेत.
सुधीर गोठणकर (कथा: न्यायनिवाडा, स्वलिखित), संध्या तांबे (कथा: निर्धार, लेखिका: कुसुमावती देशपांडे), वैदेही आरोंदेकर (कथा: भुताचा जन्म, लेखक: द.मा. मिरासदार), डॉ. सई लळीत (कथा: भिमाक्का, स्वलिखित), सतीश लळीत (कथा: शांतु परुळेकराची दशावतारी पार्टी, लेखक: मधु मंगेश कर्णिक), नम्रता रासम (कथा: कलामांचे व्रत, लेखक: शंकर क-हाडे), मिताली मुळीक (कथा: बाकी वीस रूपयांचं काय?, लेखक: बाबाराव मुसळे), अनिल रेडकर (कथा: पडदेवाला, स्वलिखित) आणि पुरुषोत्तम लाडू कदम (कथा: कातडी, स्वलिखित).कार्यक्रम वेळेवर सुरु होणार असल्याने रसिकांनी २५ रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता उपस्थित रहावे, असे आवाहन समन्वयक सतीश लळीत व डॉ. सई लळीत यांनी केले आहे.00000