
काेकण रेल्वे स्टेशन मास्तरपदी आदित्य माेहितेची निवड.
खरवते-दहिवली येथील शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आदित्य माेहिते यांची काेकण रेल्वेमध्ये स्टेशन मास्तर पदावर नुकतीच निवड झाली. केंद्र शासनाच्या माध्यमातून या पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये विविध निकषांमध्ये आदित्यने यश संपादन केले. या यशाबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखर निकम यांनी त्याचे विशेष अभिनंदन केले. तसेच महाविद्यालयाच्यावतीने प्राचार्य डाॅ. सुनितकुमार पाटील यांच्याहस्ते आदित्यचा सत्कार करण्यात आला. यावेळी कृषी विभाग प्रमुख डाॅ. हरिश्चंद्र भागडे व आदित्यचे आई-वडील उपस्थित हाेते.www.konkantoday.com