
ठाकरेंच्या यादीत आयारामांचा बोलबाला.
महाराष्ट्रात सत्तापरिवर्तनाचा पण घेतलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार कोण असतील याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागलीय. त्यातच उद्धव ठाकरेंच्या पक्षाची संभाव्य 30 उमेदवारांची यादी समोर आलीय… ठाकरेंच्या या यादीत आयारामांचा बोलबाला पाहायला मिळतोय…. ठाकरेंच्या यादीत चौदा विद्यमान आमदारांव्यतिरिक्त अजून 16 नावं समोर येतायहेत.. त्यापैकी 9 म्हणजे निम्म्यापेक्षा अधिक आयारामांना संधी देण्यात आलीय. त्यामुळे निष्ठावंतांमध्ये नाराजी निर्माण होण्याची शक्यताय.शिवसेना ठाकरे पक्षाची ही सगळी खेळी निवडणुका जिंकाण्यासाठी असल्याचं म्हणत संजय शिरसाठ यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. यंदाची विधानसभा निवडणुक ही ठाकरेंच्या शिवसेनेसाठी अस्तित्वाची असणार आहे.. या निवडणुकीचे निकाल हे ठाकरेंच्या शिवसेनेचं भवितव्य ठरवणारआहे.. त्यामुळे दुसऱ्या पक्षातील बडे मोहरे टीपून ठाकरे विधानसभेच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे.. आयारामांना मानाचं पान देत असताना संकटातही सोबत असणारे शिवसैनिक नाराज होणार नाहीत याची काळजी ठाकरेंना घ्यावी लागणार आहे.