काळबादेवीत जाळ्यात सापडलेल्या तीनशे किलोच्या समुद्री कासवाला जीवदान


रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी येथील मच्छिमारी नौकेच्या जाळ्यात तब्बल तीनशे किलो वजनाचे समुद्री कासव सापडले. जाळ्यात सापडलेल्या समुद्री कासवाला नौकेवरील तरूणांनी जीवदान देत पुन्हा समुद्रात सोडले. काळबादेवी येथील संदेश मयेकर यांची मासेमारी नौका आहे. संदेश मयेकर व त्यांचे सहकारी रूपेश मयेकर, गणेश मयेकर यांच्यासोबत मासेमारी करिता समुद्रात गेले होते. मासेमारी डोल पाण्यात सोडल्यानंतर या डोलीत मासळीसह एक मोठे समुद्री कासव देखील सापडले. हे कासव तब्बल तीनशे किलो वजनाचे होते.
या कासवाला बोटीवर घेतल्यानंतर बोटीवरील तरूणांनी या कासवाची मासेमारी जाळ्यातून सुटका केली. नंतर या कासवाला पुन्हा समुद्रात सोडून देण्यात आले आहे. या घटनेचा पूर्ण व्हिडिओ या तरूणांनी चित्रित केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच तरूणांच्या कामगिरीचे कौतूक करण्यात येत आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button