
मालगुंड आरोग्य केंद्राची दमदार कामगिरी नागरिकांन मध्ये समाधान.
रत्नागिरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड हे राज्यातील विशेष पर्यटणाचा दर्जा मिळालेल्या गणपतीपुळे तिर्थक्षेत्रअसलेल्या ठिकाणचे आरोग्य केंद्र म्हणून विशेष लक्षात राहणारे आहे. वाढती पर्यटकांची संख्या त्यात त्यांना लागणाऱ्या आरोग्य सेवा याचा विचार करता हे आरोग्य केंद्र केंद्रबिंदू आहे. मागील आर्थिक वर्षात जुने नवीन असे एकूण बारा हजार नागरिकांची वैद्यकीय अधिकारी डॉ. मधुरा जाधव व डॉ सुनीता पवार यांचे मार्फत तपासणी करण्यात आली आहे प्राथमिक आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारतिचे बांधम सुरु असल्याने कर्मचारी कॉर्टर मध्ये कामकाज सुरु आहे.
आशा परिस्थिती ही अपुऱ्या जागेत पाच प्रसूती करण्यात आल्या आहेत कार्यक्षेत्रात एकूण 20 गावे 10 ग्रामपंचायतीचा समावेश असून पाच आरोग्य वर्धिनी उपकेंद्र आहे. एकूण 79 विंचूदंश, 85 स्वानदंश, 8 सर्पदंश, तर इतर प्रकारचे 46 दंशा वर उपचार करण्यात आले आहे. आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रात हिवातपासाठी अठराशे रक्तनमुने घेण्यात आलेले आहेत. क्षय रुग्णांसाठी सौंशयित म्हणून सातशे पेक्षा जास्त थुंकी नमुने तपासन्यात आले आहेत आणि त्यातील 34 रुग्णाना क्ष्यरुग्णांचेउपचार करण्यात आले आहे. आरोग्य केंद्र अंतर्गत उपकेंद्र गणपतीपुळे, कळझोडी, व धामणसे या उपकेंद्रना कायकल्पचे उत्तेजनार्थ 25 हजाराचे बक्षीस मिळाले आहे.
कमी कर्मचारी वर्ग असताना ही मागील आर्थिक वर्षात आरोग्य केंद्रातील अधिकारी कर्मचारी यांनी उल्लेखनीय कामगिरी कसरत आहेत. आपल्या नियमित कामा व्यतिरिक्त रक्तदान शिबीर, नागरिकांची आरोग्य तपासणी शिबीर मोतीबिंदू तपासणी शिबीर, आभा कार्ड व गोल्डन कार्ड काढण्यासाठी विशेष शिबीरे आयोजित करून नागरिकांना सेवा देण्यात येतात.आरोग्य केंद्रातील बहुसंख्य भाग हा समुद्र किनाऱ्याने वेढलेला असल्याने पर्यटक मोठ्या संख्येने आकर्षित होतात आणि त्यामुळे बुडणाऱ्या पर्यटकांची संख्या ही विशेष असतें त्यांना तात्काळ उपचार आरोग्य केंद्राचे माध्यमातून देऊन जीवादान देण्यात येते.
राज्याचे उद्योग मंत्री रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदयजी सामंत यांचे पुढाकारणे तसेच मा मुख्यकार्यकारी अधिकारी या पूर्वीचे श्री. कीर्तिकिरण पुजार व आत्ताच्या मा.वैदेही रानडे मॅडम आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये साहेब यांचे प्रयत्नाने तालुका आरोग्य अधिकारी मा. डॉ. महेश्वरी सातव मॅडम यांचे मार्गदर्शना खाली आरोग्य केंद्राचे इमारत बांधकाम सुरु आहे. या पेक्षाही अधिक चांगल्या प्रकारे आरोग्य सेवा नवीन इमारतीमध्ये दिल्या जातील अशी नागरीकांची अपेक्षा आहे त्या साठी लवकरात लवकर इमारतीचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी प्रयत्न व्हावेत.