
२२१ कामगारांना कमी केल्यामुळे साफयीस्ट विरोधात बेमुदत उपोषणाला दसपटीचा पाठिंबा
गाणे-खडपोली औद्योगिक वसाहतीतील साययीस्ट कंपनीत निर्माण झालेला कर्मचारी वाद अद्याप न मिटल्याने १४ नोव्हेंबरपासून कर्मचारी कंपनीसमोर बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. त्यांच्या नियोजनासाठी कामगारांनी सोमवारी गाणे येथील केदारनाथ मंदिरात घेतलेल्या बैठकीत दसपटीतील ग्रामस्थांनीही पाठिंबा दिला आहे.
गेल्या महिन्यात कंपनीने कोणतेही कारण न देता २२१ कामगारांना कामावरून कमी केल्याने कामगार आणि व्यवस्थापन यांच्यात वाद निर्माण झाला आहे. त्यानंतर घडलेल्या अनेक घटनानंतर कंपनीने टप्प्या टप्प्याने १६३ कामगारांना कामावर घेवून उर्वरित ५८ कामगारांना आजही कामावर घेतलेले नाही.www.konkantoday.com




