
मटण-मच्छी मार्केट इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट करा, माजी नगरसेवक इनायत मुकादम यांची मागणी.
चिपळूण शहरातील मटण-मच्छि मार्केटच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट करा तसेच लिलाव प्रक्रियेपूर्वी अपूर्ण कामे पूर्ण करण्याची मागणी माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी नगर परिषदेकडे निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, मटण मच्छिमार्केट इमारतीतील व्यावसायिक गाळे पुढील ३० वर्षांसाठी भाडे तत्वावर देण्यासाठी जिल्हास्तरीय त्रिसदस्यीय समितीने मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण केली असून लवकरच लिलाव प्रक्रिया होणार आहे, असे असले तरी या इमारतीची दुरावस्था झाली असून अशा स्थितीत तिचा वापर करणे धोकादायक आहे.www.konkantoday.com