
वेळास समुद्र किनारी कासव संग्रहालय हेमंत सारदुलकर यांनी केला शासनाकडे प्रोजेक्ट सादर.
वेळास येथील समुद्र किनारी आढळून येणारे ऑलिव्ह रिडले जातीचे समुद्री कासवांचा जन्मोत्सव पाहण्यासाठी देश, राज्यातील अनेक पर्यटक या गावात दरवर्षी भेट देतात. अरबी समुद्राच्या किनार्यावरील निसर्गरम्य वातावरणात पसरलेल्या या गावात २००७ साली सागरी कासव संवर्धन मोहीम सुरू झाली. या मोहिमेच्या माध्यमातून हजारो कासवांना जीवनाचा नवीन मार्ग मिळाला आहे. या मोहिमेची दखल पूर्ण देशाने घेतली. कासवांचा जन्मोत्सव सोहळा पाहण्यासाठी पूर्ण देशातून पर्यटक या गावात येतात. यामुळे मिळालेली कासवांचे गाव ही नवीन ओळख आणखी पुढ येण्यासाठी येथे जागतिक दर्जाचे कासव संग्रहालय उभे करण्यात यावे या मागणीसाठी येथील ग्रामस्थ आग्रही आहेत.वेळास गावाचा समुद्र किनारा देशातील पहिला कासव संरक्षित किनारा म्हणून घोषित झाला आहे.
या पार्श्वभूमीवर समुद्र किनार्यालगतची ग्रामपंचायतीचे ताब्यातील चौदा एकर जागची या प्रकल्पासाठी निवड करण्यात आली आहे. कासव संग्रहालय कसे असावे याचे पूर्ण मॉडेल येथील ग्रामस्थ हेमंत सालदुरकर यांनी प्रोजेक्ट रूपाने तयार केले आहे. यात जगातील सर्व जातीच्या कासवांचे संगोपन करणे अपेक्षित आहे. त्यासाठी आवश्यक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यात आला व श्री सालदूरकर याकामी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करीत आहे. नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी रत्नागिरीचा दौरा केला यावेळी श्री सालदुरकर, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष लुकमान चिखलकर, ऍड. राकेश साळुंखे, राजेंद्र पड्याळ, केतन दरिपकर, निशांत भाटकर, भालचंद्र नागवेकर, सुनील खाडे, सालेम सय्यद आदींनी उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांची या विषयाकरिता भेट घेतली.www.konkantoday.com