
*प्रदूषणकारी कारखान्यांची संख्या चिंताजनक, ठाणे जिल्ह्यातील प्रदूषणकारी कारखान्यांची संख्या २ हजार २९४*
_____ठाणे – मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील हवा प्रदूषित असल्याचे अनेकदा विविध अहवालांतून समोर आले आहे. असे असतानाच आता जिल्ह्यातील विविध प्रदूषण नियंत्रण मंडळांकडून दरवर्षी प्रमाणे जाहीर करण्यात येणाऱ्या संवर्गनिहाय कारखान्यांच्या अहवालातून जिल्ह्यात २ हजार २९४ कारखान्यांचा प्रदूषण निर्देशांक ६० पेक्षा अधिक म्हणजेच प्रदूषणकारी असल्याची माहिती समोर आली आहे. याच बरोबर ४१ ते ५९ इतका प्रदूषण निर्देशांक असलेल्या कारखान्यांची संख्या देखील १ हजार ८९५च्या घरात आहे. तर यामध्ये सर्वाधिक १०९७ इतक्या प्रदूषणकारी कारखान्यांची संख्या ठाणे जिल्ह्यात आहे.www.konkantoday.com