
जिल्हा परिषद सुशिक्षीत बेरोजगार अभियंता व मजूर सहकारी संस्था काम वाटप समिती सभा 18 मार्च रोजी
रत्नागिरी, दि. 11 : जिल्हा परिषदेची सुशिक्षीत बेरोजगार अभियंता व मजूर सहकारी संस्था यांच्याकरिता काम वाटप समिती सभा दि. 18 मार्च रोजी सकाळी 11.30 वाजता कै. शामराव पेजे सभागृह, जिल्हा परिषद येथे आयोजित करण्यात आलेली असल्याचे सदस्य सचिव काम वाटप समिती तथा कार्यकारी अभियंता, जि.प. बांधकाम विभाग यांनी कळविले आहे.
या सभेमध्ये रु. 10 लक्षच्या आतील कामांचे वाटप होणार आहे. सभेचा वार व दिनांक व काम वाटप प्रकारची माहिती पुढीलप्रमाणे आहे. मंगळवार दि. 18 मार्च रोजी मजूर सहकारी संस्था (पूर्ण जिल्हा), सुशिक्षीत बेरोजगार अभियंता (विद्युत) सुशिक्षीत बेरोजगार अभियंता (स्थापत्य) संपूर्ण जिल्हा साठी सकाळी 11.30 वाजता काम वाटप समिती सभा आहे.000